Water Supply Distribution

  • सर्व साधारण कामाचे स्वरुप
  • नागरिकांसाठी उपयुक्त माहीती
  • डाउनलोड करता येण्याजोगे फ़ॊर्म/चेकलिस्ट ई.
  • महत्वाचे सुरु असलेल प्रकल्प
  • पुर्वी पुर्ण केलेले महत्वाचे प्रकल्पाची थोडक्यात माहिती

सर्व साधारण कामाचे स्वरुप

नाशिक शहराची सन २००१ ची लोकसंख्या १०.७७ लक्ष व सध्याची सन २००७ ची लोकसंख्या सुमारे १४.२५ लक्ष इतकी आहे.
नाशिक शहरासाठी करणेत येत असलेला पाणी पुरवठा हा गंगापुर धरणातुन सुमारे २८० दशलक्ष लिटर्स / दिन व दारणा नदीतुन (चेहेडी बॅरेज) सुमारे ३० दशलक्ष लिटर्स असे एकुण सुमारे ३१० दशलक्ष लिटर्स / दिन पाणी उचलुन करणेत येतो. सदर पाणी शहरातील विविध पाच जलशुद्धिकरण केंद्रातुन शुद्ध करुन संपुर्ण शहरात सुमारे ७० जलकुंभाद्वारे व सुमारे १४०० कि.मी. पा‌ईप ला‌ईनद्वारे वितरित करणेत येते.
शहरातील पाच जलशुद्धिकरण केंद्र व त्यांची क्षमता पुढिलप्रमाणे आहे.
नाशिक (बाराबंगला) - क्षमता ८१ द.द.लि / दि.
पंचवटि - क्षमता ७१ द.द.लि / दि.
गांधीनगर - क्षमता २६ द.द.लि / दि.
नाशिकरोड - क्षमता ७३ द.द.लि / दि.
शिवाजीनगर (सातपुर) - क्षमता ९७ द.द.लि / दि.
अशी एकुण क्षमता ३४८ द.द.लि / दि. आहे.
शहरातील सध्या करणेत येत असलेल्या पाणी पुरवठा हा सरासरी १५० लिटर प्रती व्यक्‍ती / दिन याप्रमाणे करण्यात येत आहे. नाशिक शहराची वाढती लोकसंख्या व त्यानुसार आवश्यक असलेल्या पायाभुत सुविधांमध्ये सुधारणा करणेसाठी जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनर्निमाण आभियानांतर्गत देशातील ६३ शहरांसोबत नाशिक शहराची निवड झाली आहे. या आभियानांतर्गत इतर अनेक प्रकल्पांपैकी नाशिक शहराच्या भविष्यातील पाण्याचे मागणीचा विचार करुन सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र शासनास सादर करावयाचा आहे. महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने नाशिक शहराचा शहर विकास आराखडा मंजुर केला असुन त्यामध्ये शहराच्या भविष्यातील पाणी पुरवठा योजनेस मंजुरी दिलेली आहे. या आराखड्याप्रमाणे शहराची भविष्यातील लोकसंख्या व पाणी मागणी पुढीलप्रमाणे आहे.

वर्ष लोकसंख्या(लक्ष) पाण्याची मागणी( द.ल.लि / दि) पाण्याची वार्षिक मागणी(द.ल.घ.फ़ु)
२००७ १४.२४ ३१० ३५००
२०११ १७.५० ३३७ ४३४२
२०२१ २६.०० ५०० ६४४२
२०२६ ३१.८५ ६१३ ७८९८
२०३१ ३७.५० ७२१ ९२९०
२०४१ ५२.५० १०९६ १४११३

उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे शहराची भविष्यतील लोकसंख्या व त्यासाठी लागणारी वाढीव पुरवठा यंत्रणा उभारणी करणेचे नाशिक महानगरपालिकेने नियोजन सुरु केले आहे.

जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनर्निमाण अभियान अंतर्गत पाणी पुरवठा विभागासाठी ५०.५२ कोटीचा प्रकल्प अहवाल (पॅकेज-१) मंजुर झाला असुन त्यानुसार विविध कामे सुरु झालेली आहे. उदा. नवीन न‌ऊ पाण्याच्या टाक्या, ट्रिटमेंट प्लॅंट क्षमता (४८.५ + २६ एम.एल.डी) वाढविणे, रायझिंग मेन पा‌ईप ला‌ईन टाकणे, विविध ठिकाणी अल्ट्रा सोनिक फ़्लो मीटर बसविणे व विविध व्यासाच्या वितरण वाहिन्या टाकणे.

गंगापुर धरण (५६३०), काश्यपी (१८६१) व गौतमी (१८८३) य़ाप्रमाणे गंगापुर धरणातुन एकुण ९,४०० द.ल.घ. फ़ुट पाणि उपलब्ध होत आहे. तसेच दारणा नदिवरील दारणा धरण व उपनद्यांवरील इतर धरणे यांची एकुण क्षमता १५,६६३ द.ल.घ. फ़ुट इतकी आहे.

नशिक शहराचा पाणि पुरवठा प्रकल्प अहवाल करणेसाठी सन २०४१ ची लोकसंख्या सुमारे ५२.५० लक्ष विचारात घेतल्यास त्यासाठी वार्षिक पाण्याची आवश्यकता ही १४११३ द.ल.घ.फ़ुट इतकी येते. सदर आरक्षण करावयाचे पाण्या पैकी सुमारे ६० ट्क्के पाणी म्हणजेच ८४६७.८० द.ल.घ.फ़ुट हे मलशुद्धिकरण केंद्रातुन प्रक्रिया करुन पुन्हा शेतीसाठी व इतर वापरण्याकरिता उपलब्ध होणार आहे.

यास्तव सन २०४१ वर्षासाठीच्या लोकसंखेचा विचार केल्यास गंगापुर,कश्यपी व गौतमी व प्रस्तावित किकवी धरणातुन सुमारे ६,००७ द.ल.घ.फ़ुट व एकुण वार्षिक मागणीनुसार १४,११३ द.ल.घ.फ़ुट पाण्याचे आरक्षण करणेत आले आहे.

तसेच शहराच्या भविष्यातील पाणी मागणी नुसार प्रस्तावित किकवी धरण बांधणेचा प्रस्ताव जलसंपदा विभागा मार्फ़त कार्यान्वीत हो‌ऊन त्याचा संपुर्ण खर्च प्रकल्प अहवालात समाविष्ट करुन केंद्र शासना कडुन त्यास निधि उपलब्ध होणार आहे. त्याबाबतही जलसंपदा विभागा मार्फ़त उचित कार्यवाही करणेत येत आहे.

नाशिक शहराच्या वाढिव पाणी मागणी नुसार तसेच मुकने, व काश्यपी धरणांची उंची विचारात घेता या धरणातून थेट पा‌ईप ला‌ईन द्वारे शहरास पाणी पुरवठा करणेचा प्रस्ताव विचारात घे‌ऊन प्रकल्प अहवालात अंतर्भुत करणेचा आहे.

याप्रमाणे नाशिक शहरासाठी सन २०४१ वर्षासाठीचे लोकसंख्येस आवश्यक पाण्याच्या आरक्षणाबाबत जलसंपदा विभागामार्फ़त मान्यता मिळाली असून केंद्रशासनाकडून या प्रकल्पासाठी सुमारे ५०० कोटी निधि उपलब्ध हो‌ऊ शकेल.

शहराच्या सध्याच्या १४.२५ लक्ष लोकसंख्या विचारात घेऊन जवाहरलाल नेहरु राष्ट्रिय नागरी पुनर्निर्माण अभियाना अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाला सादर करणेसाठी उचित कार्यवाही करणेत येत आहे.

Exiting MBR from Gandhinagar
Sr.No. ESR Capacity in lakh liters
1 Gandhinagar ESR no.4 22.50

2.25 MLD

Exiting ESR From Gandhinagar
Sr.No. ESR Capacity in lakh liters
1 2 3 4 5 6 7 Gandhinagar ESR no.1 Gandhinagar ESR no.2 Gandhinagar ESR no.3 Eachamni ESR Shivshakti Vhitgao Vadnair 13.62 15.30 22.50 15.00 10.00 10.00 1.50

87.92
8.7 MLD

Proposed ESR from Gandhinager
Sr.No. ESR Capacity in lakh liters
1
2
3
Shivshkti
Shikhrawadi/Naharunagar
Pakhal wadala rd.junction
20.00
20.00
20.00

60.00
6.0 MLD


Gandhinagar Existing WTP capacity - 26.0 MLD
Gandhinagar proposed WTP capacity - 26.0 MLD
52.0 MLD ESR Required 1/3 of WTP capacity i.e. 1/3x52.0 =17.33 MLD
Existing ESR from Gandhinagar - 8.70 proposed ESR from Gandinagar - 6.00 14.70MLD

नागरिकांसाठी उपयुक्त माहीती

सन २०४१ पर्यंत वाढणार्‍या लोकसंखेचा पाणी पुरवठा योजना राबविणे :
संक्षिप्त टिपण्णी :-
नाशिक शहराची लोकसंख्या व आवश्यक पिण्याचे पाणी ..................

वर्ष लोकसंख्या (लक्ष) आवश्यक पिण्याचे पाणी द.ल.लि.प्रति.दिन एमएलएडी आवश्यक व मंजुर वार्षिक पाणी आरक्षण पाणी पुर्नवापरा अंतर्गत उपलब्ध होणारे पाणी (६५ टक्के)
      द.ल.घ.फ़ुट द.ल.घ.मी टी.एम.सी द.ल.घ.फ़ुट द.ल.घ.मी टी.एम.सी
२००८ १५.५० ३४० ४५०० १२८.०० ४.५ २९२५ ८३.०० २.९
२०११ १७.५० ३५३ ४९७४ १४०.८५ ४.९ ३२३३ ९१.०० ३.२
२०२६ ३१.७५ ६१७ ९०२८ २५५.९० ९.०३ ५८६८ १६६.०० ५.८
२०४१ ५२.५० ९९८ १४११३ ३९९.६३ १४.१३३ ९१७३ २६०.०० ९.३


जवाहरलाल नेहरु राष्ट्रिय नागरी पुनर्निर्माण अभियानांतील प्रस्ताव :-(सी.डी.पी.)

पाणी पुरवठा प्रकल्प ट्प्पा एक सन २०१६ पर्यंत ट्प्पा दोन सन २०१६ नंतर
पाणी पुरवठा योजना ३९९.५९ कोटी ४६१ कोटी
स्त्रोत विकास (सोर्स) - ३२३ कोटी
एकूण ३९९.५९ कोटी ७८४ कोटी



एकंदर एकून :- र.रु.११८३.५९ कोटी
पाणी पुरवठा (प्रकल्प) पॅकेज -१ :-
र.रु.५०.५२ कोटी किंमतीच्या प्रकल्पास मंजुरी असून त्यानुसार सुमारे ८० टक्के कामे पुर्णत्वास आले आहे.
पाणी पुरवठा (प्रकल्प) पॅकेज २ :-
सन २०४१ नुसार हेडवर्कस व सन २०२६ नुसार जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभाचे कामे,वितरण वाहिन्या इ. करणेसाठी सुमारे र.रु. ५०५ कोटीच्या प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये १) हेडवर्कस व रॉ वॉटर मेन र.रु.१०५.०० कोटी, २) जलशुध्दीकरण केंद्र व इतर - र.रु.३७.०० कोटी, ३) शुध्द पाण्याचे उर्व्धवाहीनी - र.रु.१६८.०० कोटी, ४) जलकुंभ व पंपीग मशिनरी - र.रु.९२.०० कोटी ५) वितरण वाहिण्या - र.रु.१००.०० कोटी (एकंदर एकुण- र.रु. ५०५.०० कोटी)
पाटबंधारे विभागाचे कामे (स्त्रोत विकास) :-
या अंतर्गत किकवी धरणासाठी सुमारे २०० कोटी, पाणी पुनर्वापरासाठी नदीपात्रात बांधावय़ाचे बांधार्‍यांसाठी सुमारे र.रु.८० कोटी, बिगर सिंचन क्षेत्राचे पूनुर्प्रस्थापनेसाठी र.रु.८० कोटी. जलविद्युत निर्मिति न हो‌ऊ शकणार्‍या (फक्‍त काश्यपी धरण) संबंधी र.रु.२० कोटी नुकसान भरपा‌ई.अशी एकुण र.रु.३८० कोटी खर्च अपेक्षित आहे. भविष्यातील वाढीव रक्कम अतिरिक्‍त राहणार आहे.

डाउनलोड करता येण्याजोगे फ़ॊर्म/चेकलिस्ट ई.

 

 

महत्वाचे सुरु असलेल प्रकल्प

नाशिक शहराच्या २६० चौ.कि.मी.क्षेत्रफळामध्ये व सुमारे १६ लक्ष लोकसंख्येसाठी ५ जलशुध्दीकरण केंद्र,८५ जलकुंभाद्वारे व सुमारे १८०० कि.मी.पा‌ईप ला‌ईनद्वारे दैनंदिन सुमारे ३५० द.ल.लि.प्रतिदिन पाणी पुरवठा करणेत येतो. सदर पाणी पुरवठा करतांना पाण्याची तुट शोधणेसाठी त्याचे नियमितपणे पाणी परिक्षक करणेसाठी योजना राबविणेचा निर्णय घेणेत आला.
योजना :- नाशिक शहरासाठी संपुर्ण पाणी पुरवठा योजनेमधील महत्वाचे ११० ठीकाणी बल्क फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेणेत आले. त्यामध्ये गंगापुर धरणातून उचलनेत येणारे पाणी व चेहडी येथिल दारणा नदीतून उचलणेत येणारे पाणी मोजणेसाठी ३ बल्क फ्लो मीटर बसविणेत आले. त्यानंतर शहरातील पाचही जलशुध्दीकरण केंद्राचे आत जाणारे रॉ वॉटर व केंद्राचे बाहेर जाणारे शुध्द पाणी मोजनेसाठी सुमारे १७ बल्क फ्लो मीटर बसविणेत आले.तसेच शहरातील विविध भागात असलेल्या जलकुंभाचे इनलेट पाईपवर ९३ पैकी ६७ ठिकाणी बल्क फ्लो मीटर बसविणेत आले. या सर्व बल्क फ्लो मीटरला जेएसएस मोडेम बसविणेचे कामही हाती घेणेत आले जेणेकरुन संबंधित अभियंत्यांना एसएमएस द्वारे पाण्याचे प्रवाह व परिमाणाची वेळोवेळी व निश्चित केलेल्या ठराविक वेळेस माहिति उपलब्ध होऊ शकेल या त्यावरुन पुढील नियोजन करता येईल.
या कामामुळे रॉ वॉटर उचलणे पासून जलकुंभावरुन वितरित होणार्या पाण्याचे दैनंदिन परिणाम मिळु शकेल व त्यावरुन पाण्याचे एकुण तुट (ळोस्स) विचारात घेऊन आवश्यक उपाययोजना हाती घेता येईल. सदर काम ९० टक्के पूर्ण झाले असुन येत्या दोन महिन्यांत काम पुर्ण करणेचे नियोजन आहे.
तसेच वितरणामधील तुट शोधणेसाठी भविष्यात स्वतंत्र योजना राबविण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये शहरातील विविध भागातील ८५ जलकुंभाचे व त्यावरुन पाणी वितरित होणार्‍या क्षेत्रांचे स्वतंत्र वॉटर डिस्ट्रिक्ट तयार करणेत येणार आहे. त्या प्रत्येक वॉटर डिस्ट्रिक्ट मधील सर्व नळजोडणी मधुन वितरित होणार्‍या पाण्याचे परिणाम व जलकुंभावरुन वितरित होणार्‍या पाण्याचे परिणाम याची माहिती संकलित करणेत ये‌ईल. त्यामुळे प्रत्येक जलकुंभाचे क्षेत्रामधील तथा वॉटर डिस्ट्रिक्ट मधील एकुण पाण्याची तुट विचारात घे‌ऊन त्यानुसार आवश्यक उपाययोजना करता येईल.
नाशिक शहरामध्ये एकुण १,४९,००० नळ्जोडणी असुन २३,००० नळजोडनी बिगर मीटरचे होते.यासाठी विशेष अभियान राबवुन २३,००० पैकी १९,००० नळजोडणीला मीटर बसविणेत आले व त्यामुळे ९८ टक्के नळजोडणी मीटरसह असुन १०० टक्के मीटर पध्दत नजिकच्या भविष्यात पुर्ण करणार आहे
या संपुर्ण योजनेमुळे नियमितपणे पाणी परीक्षण करणेचे महत्वाचे काम मार्गी लागेल.

पुर्वी पुर्ण केलेले महत्वाचे प्रकल्पाची थोडक्यात माहिती

नाशिक शहरामधील सन २००८ ची लोकसंख्या सुमारे १७ लक्ष पर्यत वाढलेली असुन यासाठी पाणी पुरवठयासाठीची अतिरिक्त मागणी उन्हाळ्यात प्राप्त होते. त्यासाठी शहरातील पुढे नमुद केल्याप्रमाणे पाच जलशुध्दीकरणातून पिण्याचे पाणी प्राप्त होत आहे.

  • १) बाराबंगला जलशुध्दीकरण केंद्र :- (८७ द.ल.प्रति दिन)
  • २) पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र :- (७० द.ल.प्रति दिन)
  • ३) गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र :- (२५ द.ल.प्रति दिन)
  • ४) नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र :- (४७ द.ल.प्रति दिन)
  • ५) शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र :- (९० द.ल.प्रति दिन)
यामधून शहरी विभागातून ३२० द.ल.लिटर्स पाणी जलशुध्दीकरण केंद्रातून वितरण करणेत येते.यामध्ये बिगर घरगुती पाणी वापर सुमारे ३५ द.ल.लिटर्स व वितरणातील तुट विचारात घेता सरासरी १५० लिटर प्रती व्यक्ति पाणी पुरवठा करणेत येतो. तसेच प्रत्येक वर्षी शहराची सुमारे ७५ ते ८० हजार लोकसंख्या वाढ होत असुन त्यानुसार वाढीव पाणी मागणी होत आहे.

नविन नाशिक ( सिडको ) विभागामध्ये पाणी वितरणाबाबत दिनांक १७ एप्रिल २००८ चे महासभेत मोठ्या प्रमाणात तक्राराची नोंद झाली आहे. या विभागातील काहि भागात उन्हाळ्यामध्ये कमी पाणी प्राप्त होत असल्याच्या वारंवार तक्रारी येत आहे व यामध्ये त्वरित सुधारणा करणेची मागणी होत आहे.

यादृष्टीने मा.महापालिका आयुक्त सो.मा.अधिक्षक अभियंता व पाणी पुरवठ्यामधील सर्व संबंधित अधिकारि व कर्मचारि यांची तातडिची बैठक शुक्रवार दिनांक १८/४/२००८ रोजी घेणेत आलि व त्याबाबत तातडिची कार्यवाहि करणेबाबत सविस्तर चर्चा झाली.

त्याचबरोबर गंगापुर धरणाजवळील जॅकवेल येथे भेट दे‌ऊन पंपींग यंत्रणेमध्ये सुधारणा करुन ज्यादा पाणी उपसा करणेचे दृष्टीने सहावा पंप चालु करणेचा निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे शनिवार दिनाक १९/०४/२००८ रोजी पहाटे ४.०० पासून त्याची अंमलबजावणी करणेत आली. यामुळे शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रातून प्राप्त होणारे पाणी वाढवून ते ९० ऎवजी ९७-९८ द.ल.लि.प्रति दिन पर्यत प्राप्त होऊ शकेल. यामुळे सातपुर व नविन नाशिक(सिडको) विभागामध्ये उन्हाळ्यातील वाढीव पाणी मागणीची पुर्तता करणे शक्य होईल.

तसेच या पंपींग स्टेशन वरील जादा क्षमतेचे नविन चार पंपींग मशिनरी बसविणेचे काम किर्लोस्कर कंपनिला दिलेले आहे. त्याचा आढावा घेणेत आला.सदर कामास गति दे‌ऊन ते त्वरित पुर्ण करणेचे आदेश सर्व संबंधितांना देणेत आले.सदर नविन पंप बसविल्यानंतर पंपींग क्षमता ९७ वरुन १४५.५ द.ल.लि.प्रति दिन पर्यत वाढनार आहे. त्याचप्रमाणे शिवाजिनगर जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढ करणेसाठी ४८.५ द.ल.लि. प्रति दिन क्षमतेचे जलशुध्दिकरण केंद्र बांधणेचे काम विकसित करणेत येत आहे. त्यामुळे सातपुर व नविन नाशिक (सिडको) भागासाठी व भविष्यातील वाढीव लोकसंख्ये साठी ९७ वरुन १४५.५ द.ल.लि.प्रति दिन क्षमतेचे जलशुध्दिकरण केंद्र उपलब्ध होणार आहे.

नविन नाशिक विभागातील वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा होणेसाठी पाथर्डी गावाजवळ २०.०० लक्ष लि.क्षमतेचा जलकुंभ बांधुन गेल्याच वर्षी कार्यान्वित केला आहे. तसेच अश्विननगर व भुजबळ फार्म शेजारी असे २० लक्ष लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ बांधणेचे काम प्रगतित आहे.व नजिकच्या भविष्यात त्याचा उपयोग सुरु होणार आहे.त्याचप्रमाणे कामटवाडा शिवारातिल वाढीव लोकवस्तिसाठी वृंदावन नगर येथे नविन २० लक्ष लि.क्षमतेचा जलकुंभ बांधणे व सावतानगर भागात नविन २० लक्ष लि.क्षमतेचा नविन जलकुंभ बांधणेचे कामाचे निविदा प्रसिध्द करणेत आलि आहे. त्याचेहि काम नजिकच्या भविष्यात सुरु हो‌ईल. सातपुर विभागातिल रामराज्य सोसायटीजवळील २० लक्ष लि.क्षमतेचा जलकुंभ पुर्ण झाला असुन, त्याचा उपयोग शनिवार दिनांक १९/०४/२००८ पासुन करणेत येत आहे. तसेच सातपुर हौसिंग कॉलनीमधील जलकुंभ पुढील आठवड्यात कार्यान्वित होत आहे व त्यामुळे सातपुर विभागातील पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार आहे. तसेच जी.पी.ओ,दसक,सातपुरगाव,बळवंतनगर येथील जलकुंभाचे काम प्रगतीत आहे.

सन २००७-०८ मध्ये नविन नाशिक विभागातिल काहि भागात मोठ्या व्यासाचा पा‌ईप ला‌ईन टाकणेचे व इतर अनेक कामे मंजुर झाली असुन त्यानुसार सुमारे १८ कोटी रक्कमेचे कामाचे नियोजन व त्याचीहि अंमलबजावणी हो‌ऊन पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार आहे.

जवाहरलाल नेहरु राष्ट्रिय नागरी पुनर्निर्माण अभियाना अंतर्गत मुकणे धरणातुन थेट पा‌ईप ला‌ईन योजना राबविणे व त्यामध्ये पाथर्डी शिवारात मुंब‌ई जकात नाक्या लगत ट्रक टर्मिनस साठी संपादित जागेत जलशुध्दीकरण केंद्र बांधणे व त्यावरुन नविन नाशिक भागामध्ये विविध वार्डातील सन २०२६ चे अपेक्षित लोकसंख्या विचारात घे‌ऊन नविन जलकुंभ बांधणेचे नियोजन हाती घेणेत आले आहे.

नाशिक शहरातील उपलब्ध ७१ जलकुंभावरुन वितरित होणारे पाणी व त्या.त्या. जलकुंभावरिल क्षेत्रातील लोकसंख्या याचा विचार करुन सर्वांना समान पाणी पुरवठा होणेसाठी उचित नियोजन करणेत येत आहे व या उन्हाळ्यात एप्रिल/मे कालावधीत संपुर्ण शहरात पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करणेसाठी कार्यवाहि करण्यात येत आहे.

शहरातील सुमारे १६०० कि.मि.लांबीच्या पाईप ला‌ईनची दुरुस्ति देखभालिसाठी प्रत्येक विभागात मक्तेदारामार्फत पा‌ईप ला‌ईन गळती त्वरित दुरुस्ति होणेसाठी सुचना देणेत आल्या आहेत. जेणेकरुन पाणी वितरणातिल तुट कमी होऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकेल.